आपुलकीच्या माणसांसाठी.
1) डोंगरावर चढणारा झुकूनच चालतो. पण जेव्हा तो उतरू लागतो तेव्हा ताठपणे उतरतो. हा निसर्गाचा नियम आहे. कोणी झुकत असेल तर समजावे की तो उंचावर जात आहे आणि कोणी ताठ वागत असेल तर समजावे की तो खाली चालला आहे.
2) भूक लागली म्हणून, भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही. आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही. म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे. पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा, आयुष्यभर प्रामाणिक राहून कमाविलेली सोन्यासारखी माणसं हिचं आपली श्रीमंती असते.
_3) घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण जग एक बाजार आहे. परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथं एक कुटुंब आहे
4) कुटुंब हे घड्याळ्याच्या काट्यासारखं असलं पाहिजे... कोणी लहान, कोणी मोठा, कोणी स्लो, कोणी फास्ट पण जेव्हा कुणाचे बारा वाजणार असेल तेव्हा मात्र सगळे एकत्र पाहिजे...
_5) चांगले व्यक्तीमत्व कधीच जन्म घेत नाही ते निर्माण करावे लागते. आपल्या सोबत दुस-यांच ही भल व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीच कमी पडत नसते.
6) प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चरित्राची व्हायला हवी कारण चांगला चेहरा बनवायला काहीशी मिनिट लागतात पण चांगले चरित्र बनवायला संपूर्ण आयुष्य..
_7) डोळे तर सगळ्यांचेच सारखे असतात पण, बघण्याचा दृष्टीकोण सारखा नसतो. आणि तोच माणसाला, माणसापासून वेगळं करतो..
8) कुठूनही घसरावं माणसानं फक्त नजरेतून घसरू नये, कारण मोडलेल्या हाडावर उपचार होऊ शकतात पण मनावर नाही.
_9) संपत्ती आणि स्थिती एखाद्यास तात्पुरते महान बनवते... पण मानवता आणि चांगली नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनविते...
10) जिथे आपण ठेच लागून पडतो तिथुनच सुरुवात होते सांभाळून चालायची. मग ती पायाला असो किंवा मनाला. पायाची ठेच शरीर जपायला शिकवते तर मनाची ठेच माणसं ओळखायला शिकवते. वेळेला वेळ देणारा माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही...
.
.
Comments