दुनियादारी च सोंग.....

 


काजू बदाम सोडून आता 

गुटखा प्रसिद्ध झाला 

अजय, अक्षय, शाहरूख सुद्धा 

विमलच खा म्हणाला 


बंद झाल्या शिक्षण जाहिराती 

जुगार प्रसिद्ध झाला 

हिंदी मराठी कलाकार सुद्धा 

रमीच खेळा म्हणाला 


बंद झालेत मैदानी खेळ 

मोबाईल वेडा झाला 

भर त्यात आय पी एल ची

त्यातही जुगार आला 


क्रिस गेल कपिल सुद्धा 

केसरच खा म्हणाला 

पामोलीव्ह का जबाब नही 

तो ही विसरून गेला  


जॅकी सुद्धा गायछाप खातो 

तो ही तेच म्हणाला 

गुटख्या मुळेच धारीवाल सुद्धा 

इतका श्रीमंत झाला 


जुगार, दारू, सिग्रेट, गुटखा 

इतका प्रसिद्ध झाला 

कुणीच नाही म्हणत याला 

तुम्ही आळा घाला


बरबाद होत आहे तरुण पिढी 

समाज व्यसनी झाला 

नाचवतो आणून गौतमी पाटील

तरीही नेताच महान झाला 


शाहू, फुले,आंबेडकर आता 

फक्त भाषणात घाला 

शिवाजी मात्र पाहिजे यांना 

शेजारीच जन्माला आला 


नेते सुद्धा हेच म्हणतात 

द्वेष जन्माला घाला 

म्हणुनच यांनी सर्व भाषणात

जातीय उल्लेख केला 


चौका चौकात जयंती साजरी 

त्यात मोठा डीजे आला 

धुंद होऊन सामील सगळेच

आचार विचार संपून गेला 


विनंती करतोय श्रीपाद तुम्हाला 

स्वतःलाच बंधने घाला 

त्यांच्या होतात जाहिराती आणी 

समाज बरबाद झाला 


हम .....   एक अनामिक




पुस्तक केव्हाही चांगलं

त्याला ना इंटरनेट ची गरज असते

ना बॅटरी संपण्याची भिती.


नको असतो त्याला ईयरफोन

की नको नेटपॅक ची लाचारी.


पुस्तकात सेव्ह डिलीट ची

सोय नसते.

पुस्तक डायरेक्ट रजिस्टर

होत असतं मेंदूत.


सोशल मीडिया वर

भाव खायला

पुस्तकच कामी येतं


पुस्तक टॅग करत नाही

पुस्तक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत नाही

पुस्तक ब्लॉक करत नाही की 

पुस्तक शिवी घालत नाही.


पुस्तक बेवफा ही नसतं

जुन्या प्रेयसी सारखं.

पुस्तक पुरवतं सगळं लाड

म्हातार्या आई सारखं


पुस्तक शिळं होत नाही

पुस्तक देता येतं

पुस्तक घेता येतं.


पुस्तक जपून ठेवतं

गुलाबाचं काळवंडलेलं फुल

पुस्तक जपून ठेवतं

पिंपळाचं झिरलेल पान.


पुस्तक फाटलं तरी रडत नाही

पुस्तक नटलं तरी हसत नाही

पुस्तक कधी बिघडत नाही

हो 

पुस्तक कधी मरत नाही.

धन्यवाद....

Comments